धुळे, यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाचा दणका

धुळे शहरात काल सांकाळी वादळी वा-यासह पावसानं हजेरी लावली. तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात सलग तिन दिवसांपासून वादळी वा-यासह जोरदार पाऊस सुरु आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 13, 2017, 11:35 AM IST
धुळे, यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाचा दणका title=

धुळे, यवतमाळ : धुळे शहरात काल सांकाळी वादळी वा-यासह पावसानं हजेरी लावली. तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात सलग तिन दिवसांपासून वादळी वा-यासह जोरदार पाऊस सुरु आहे.

वादळामुळे अनेक ठिकाणचे होर्डींग्ज उडून इतरत्र जावून पडल्या तर शेकडो घरांचेही या अवकाळी पाऊसाने नुकसान केलंय. या पावसामुळे अर्ध्या शहराचील वीज पूरवठा खंडीत झाला आहे.  

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, पेठ विभाग, जुने धुळे परीसरासह अनेक ठिकाणी गेल्या बारा तासापासून विज पुरवठा खंडीत आहे. ऐन उन्हाळ्यात विजपुरवठा खंडीत झाल्यानं नागरीक उकाड्यानं हैरण झालेत..  

यवतमाळमध्ये घरांवरील छप्पर उडालेत

यवतमाळ जिल्ह्यात सलग तिन दिवसांपासून वादळी वा-यासह जोरदार पाऊस सुरु आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक घरांवरील छप्पर उडून गेलेत. मोठी झाडं उन्मळून पडल्य़ानं वाहतूकीला अडथळा निर्माण झालाय.

तर अनेक गावांचा वीजपुरवठा खंडीत झालाय. सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरींनी पिकांचही मोठं नुकसान झालंय. दारव्हा, झरी, कळंब, बणी, मारेगाव या तालुक्यातील गावांना पावसाचा तडाखा बसलाय.