सापडलेले पैसे नक्षलवाद्यांचे तर नाहीत?

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही पोलिसांच्या धाडसत्रात सुमारे ९५ लाख रुपयांची रोख रक्कम सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 

Updated: Dec 18, 2016, 04:46 PM IST
सापडलेले पैसे नक्षलवाद्यांचे तर नाहीत? title=

गडचिरोली : देशभर नोटाबंदीनंतर पोलीस आणि प्राप्तीकर विभागाचे धाडसत्र सुरु आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही पोलिसांच्या धाडसत्रात सुमारे ९५ लाख रुपयांची रोख रक्कम सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 

या रकमेत नव्या- जुन्या नोटांचा समावेश असून, कोरची या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात ही रक्कम सापडली आहे.. या रकमेचा नक्षली आंदोलनाशी संबंध आहे का याचा तपास करण्यासाठी पोलीस अधिक सतर्कता बाळगून आहेत.