पोलिस पाटील तुम्ही पण?

स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून एक दोन नाही तर तब्बल चोरीच्या १३ चार चाकी गाड्या पकडल्यात. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केलीय. यात अमळनेर तालुक्यातल्या किशोर पाटील या पोलीस पाटलाचा समावेश आहे.

Updated: Jul 28, 2014, 09:32 PM IST
पोलिस पाटील तुम्ही पण?

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून एक दोन नाही तर तब्बल चोरीच्या १३ चार चाकी गाड्या पकडल्यात. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केलीय. यात अमळनेर तालुक्यातल्या किशोर पाटील या पोलीस पाटलाचा समावेश आहे.

गाड्या चोरणारी मोठी टोळी असल्याच पोलिसांना संशय आहे. विशेष म्हणजे ह्या चोरीच्या गाड्या विकल्या जात असतानाच पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून पकडल्या.

राज्यात गाड्या चोरणाऱ्यांच मोठ  रेकेट असून मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरपर्यंत गाड्यांचे व्यवहार झालेत. जळगाव हे चोरीच्या गाड्यांचे विक्री केंद्र असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.