भाजप नगरसेवकाच्या मुलांची स्वातंत्र्यदिनी रस्त्यावर हुल्लडबाजी

स्वातंत्र्यदिनी रस्त्यावर हुल्लडबाजी करण्याची परंपरा भाजपचे नगरसेवक मुन्ना यादव यांच्या मुलांनी सुरूच ठेवलीय खरी. 

Updated: Aug 16, 2016, 09:44 AM IST
भाजप नगरसेवकाच्या मुलांची स्वातंत्र्यदिनी रस्त्यावर हुल्लडबाजी title=

नागपूर : स्वातंत्र्यदिनी रस्त्यावर हुल्लडबाजी करण्याची परंपरा भाजपचे नगरसेवक मुन्ना यादव यांच्या मुलांनी सुरूच ठेवलीय खरी. पण मुन्ना यादव यांच्या मुलांवर आणि त्यांच्या बेताल कार्यकर्त्यांवर कारवाई न करण्याची परंपरा पोलिसांनीही मोडलेली नाही. 

संपूर्ण देश देशभक्तीत न्हाऊन निघत असताना, नागपुरात भाजप नगरसेवक आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांच्या मुलांनी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गोंधळ घातला. मारामारी करण्याची आपली जुनी परंपरा कायम ठेवली. 

एवढ्यावरच हे नेता पुत्र आणि त्याचे कार्यकर्ते थांबले नाहीत. त्यांनी रस्त्यावर धावणारी स्टार बस थांबवली आणि बसच्या टपावर नाचले. यापुढे जात त्यांनी मारामारी आणि धक्काबुक्की केली. 

मुन्ना यादव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू नेते आहेत. त्यांच्या मुलांनी सुमारे ४०० दुचाकी आणि १० चार-चाकी वाहनांच्या माध्यमाने डीजेच्या तालावर आणि सैराटच्या गाण्यांच्या ठेक्यावर नाचत सुमारे १,५०० मुन्ना समर्थकांनी आपल्या देशभक्तीचा 'शो-ऑफ' केला.