महाड : महाड दुर्घटनेतील १४ जणांचे मृतदेह सापडेत. सर्व मृतदेहांची ओळख पटलीय.
एक आंजर्ले, एक हरिहरेश्वर, केंभुर्लीत तीन, दादली पूल इथं दोन, कोराडीजवळ एक, आंबेत पूलाजवळ तीन आणि वऱ्हाडी गावाजवळ एक मृतदेह सापडलाय.
महाडच्या दुर्घटनेनंतर बेपत्ता नातेवाईकांचा आक्रोश झी २४ तासवर दाखवल्यावर आता प्रशासनाला जाग आलीय. जिल्हा प्रशासनानं घटनास्थळी आणि महाडमध्ये आपत्ती मदत केंद्र सुरू केलीयत. कुटुंबियांच्या राहण्याची सोय करण्यात आलीय. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी मदती कुठे मिळे यासाठी उद्घोषणा सुरू झाल्यात.
केंभुर्ली इथं सापडलेला मृतदेह हा संपदा संतोष वाजे यांचा असून त्या रत्नागिरी जिल्हयातील सापु गुहागर येथील रहिवासी आहेत. संपदा त्यांच्या आजारी वडिलांना भेटायला चालल्या होत्या. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला.... आणि आज त्यांच्या आजारी वडिलांचंही निधन झालं.
दरम्यान, जखमींना उपचार मिळावेत तसेच मृतदेह सुरक्षित जतन करून ठेवता यावेत यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.. महाड इथल्या ग्रामीण रूग्णालयात ४ डॉक्टरांचे पथक तयार आहे. तीसहून अधिक मृतदेह ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आलीय. खाडीकिनारी ठिकठिकाणी रूग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्यात.