गोपीनाथ मुंडेंची दुसरी कन्या लोकसभेची उमेदवार

बीड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम खाडे मुंडे याच भाजपच्या उमेदवार असणार आहेत. 

Updated: Sep 17, 2014, 08:41 PM IST
गोपीनाथ मुंडेंची दुसरी कन्या लोकसभेची उमेदवार title=

परळी : बीड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम खाडे मुंडे याच भाजपच्या उमेदवार असणार आहेत. 

भाजप कोअर कमिटीच्या सदस्या आमदार पंकजा मुंडे यांनीच आज तसे संकेत दिले. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बीडच्या जागेवर येत्या 15 ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होतेय. 

मुंडे कुटुंबातील प्रीतम खाडे मुंडे याच ही जागा लढवतील, असं पंकजा मुंडेंनी बीडमध्ये स्पष्ट केलं. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची संघर्षयात्रा आज बीडमध्ये पोहोचली. मला ताकद द्या, असं आवाहन त्यांनी परळीच्या होम पीचवर बोलताना केलं. त्यावेळी घरच्या मंडळींसमोर वडील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीनं त्यांना गहिवरून आलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.