नाशिक : बनावट नोटा छापल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भुजबळ समर्थक छबू नागरेचा 200 कोटी रूपयांच्या नोटा छापायचा कट होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
खुटवडनगरमधील औदुंबर अपार्टमेंटमधल्या ऑसम ब्युटीपार्लरमध्ये छबू नकली नोटा छापायचा. या पार्लरलमध्ये घेतलेल्या तपासणीत पोलिसांना स्कॅनर प्रिंटर आढळून आलाय. त्याच्या नाशिकसह मुंबई-पुण्यातील इतर साथीदारांच्या घरी देखील छापा टाकण्यात आलाय.
या छाप्यात फारसं काही हाती लागलेले नाही. मात्र छबू आणि त्याच्या साथीदारांवर देशद्रोहाचा ठपका ठेवण्यात आलाय. या सर्वांच्या मालमत्तांची आणि नात्यागोत्याची चौकशी देखील केली जाणार आहे. त्यातच छबूचे शहरात तीन कुटुंब असलायची माहिती समोर येतेय.