पुणे: चक्क कोर्टाचा बनावट आदेश तयार करून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींनी जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. या प्रकरणातील फिर्यादीनं ही बाब निदर्शनास आणून दिल्यांनतर या दोन्ही आरोपींना पुन्हा अटक करण्यात आलीय.
प्रतिक निम्हण या तरुणाच्या खून प्रकरणी 10 आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींची येरवड्याच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यापैकी 8 जणांची जामीनावर सुटका झाली मात्र तुषार आणि चेतन निम्हण यांचा जामीन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला, असं असताना हे दोन्ही आरोपी फिर्यादीला पाषाण परिसरात मोकाट फिरताना दिसले. त्यामुळं चक्रावलेल्या फिर्यादीनं त्यांच्या सुटकेबाबत चौकशी केली. या चौकशीदरम्यान मिळालेली माहिती ऐकून त्यांना धक्काच बसला.
चक्क कोर्टाचा बनवत आदेश तयार करून खुनातल्या या आरोपींनी जामीन मिळवत प्रत्यक्ष न्याय व्यवस्थेची फसवणूक केली. विशेष म्हणजे त्यांची मुक्तता करणाऱ्या कारागृह प्रशासनालाही या फसवणूकीची कल्पना आलेली नाही. पुण्यातली गुन्हेगांराचे हात आता किती लांबवर पोहोचलेत याचं हे उत्तम उदाहण. त्यामुळं अशाच प्रकारचे आदेश तयार करून एखाद्या आरोपीची निर्दोष मुक्तता झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.