भीमाशंकर : भीमाशंकर इथं भाविकांच्या खाजगी बसला भीषण अपघात झालाय. या अपघातात 2 ठार, 20 ते 25 जण जखमी झालेत.
पोखरी घाटामध्ये बस पलटी झाल्यानं ही दुर्घटना घडलीय. जखमींवर घोडेगाव, मंचर आणि पुणे इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे सर्व भाविक ओडिशाचे रहिवाशी असून ते पुण्यावरुन भीमाशंकरला जात होते. त्यावेळी काळानं त्यांच्यावर घाला घातला.