जालना : स्टील सिटी, बियाण्यांची पंढरी, कापडाची मराठवाड्यातली सर्वात मोठी बाजारपेठ अशी जालन्याची ओळख. त्यामुळे राजकीय दृष्ट्याही जालना हा मराठवाड्यातील एक अत्यंत महत्वाचा जिल्हा.
मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून विराजमान झालेले भाजप खासदार रावसाहेब दानवे असतील किंवा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे असतील.
या नेत्यांना जालन्यात आपापले गढ राखण्याचं आव्हान नव्याने पेलावं लागणार आहे.
जिल्ह्यात एकूण 5 विधानसभा मतदार संघ असून त्यापैकी 2 विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर शिवसेना,कॉंग्रेस,आणि अपक्षाच्या ताब्यात प्रत्येकी 1विधानसभा मतदार संघ आहे.
जालना विधानसभा मतदार संघाचं प्रतिनिधीत्व काँग्रेसचे काँग्रेसचे कैलास गोरंटयाल करीत आहे. त्यांची ही दुसरी टर्म आहे. घनसावंगी मतदार संघातून राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
राजेश टोपे सलग तीन वेळा या मतदार संघातून निवडून आलेत. भोकरदन विधानसभा मतदार संघही राष्ट्रवादीच्याच ताब्यात असून या
ठिकाणी राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे तिस-यांदा निवडून आले आहेत.
परतूर–मंठा विधानसभा मतदार संघाचं प्रतिनिधीत्व अपक्ष सुरेशकुमार जेथलीया करत आहेत. ते पहिल्यांदाच निवडून आले आहेत. तर बदनापूर मतदार संघ हा शिवसेनेच्या ताब्यात असून या ठिकाणी शिवसेनेचे संतोष सांबरे प्रतिनिधीत्व करताहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.