ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - चिखली

नागपूरनंतर विदर्भातील राष्टीय स्वयंसेवक संघाची सर्वात मोठी ताकद चिखली तालुक्यात असल्याच म्हटलं जातं... बुलढाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणूनसुद्धा चिखलीकडे बघितलं जातं. हा मतदार संघ सध्या कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. कॉंग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत काय केलं ते पाहूया...

Updated: Oct 8, 2014, 01:46 PM IST
 title=

बुलडाणा : नागपूरनंतर विदर्भातील राष्टीय स्वयंसेवक संघाची सर्वात मोठी ताकद चिखली तालुक्यात असल्याच म्हटलं जातं... बुलढाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणूनसुद्धा चिखलीकडे बघितलं जातं. हा मतदार संघ सध्या कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. कॉंग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत काय केलं ते पाहूया...

चिखली विधासभा मतदार संघ हा पूर्वीपासूनच अतिशय महत्वाचा मतदार संघ मानला जातो.चिखली मतदार संघाची एकूण मतदार संख्या २,६३,२५८ एवढी आहे.  शरद पवारांना नेहमीच साथ देणारा हा मतदार संघ आहे. 

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - डॉ. प्रतापसिंह रजपूत
भाजप - सुरेश आप्पा खबुतरे
काँग्रेस - राहुल बोंद्रे
राष्ट्रवादी - ध्रुपतराव साळवे
मनसे - विनोद खरपास 

शरद पवारांचे अतिशय निकटवर्तीय असलेले माजी मंत्री भारत बोंद्रे यांनी या मतदार संघाचे २२ वर्ष प्रतिनिधित्व केले. त्यावेळी त्यांना पाटबंधारे, उद्योग, शिक्षण अशी महत्वाची खाती शरद पवारांनी दिली. त्यानंतर १९९५ ला भारत बोंद्रे यांच्याऐवजी गांधी परिवाराचे निकटवर्तीय मुकुल वासनिक यांचे समर्थक बाबुराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ विरोधकांच्या ताब्यात गेला. पुढे  तीन टर्म या मतदारसंघातून भाजपच्या रेखा खेडेकर या आमदार म्हणून निवडून आल्या. परंतु २००९ च्या विधासभा निवडणुकीत भाजपाने रेखा खेडेकर यांच्याऐवजी प्रकाशबुवा जवंजाळ यांना तिकीट दिले.  कॉग्रेसच्या  राहुल बोंद्रे यांना ७६,४६५ तर भाजपाचे प्रकाशबुवा जवंजाळ यांना ४८,५४९ मते मिळाली होती ..या निवडणुकीत बोंद्रे यांना २७,९१६  मतांचे मताधिक्य मिळाले  आणि पुन्हा एकदा हा मतदार संघ कॉंग्रेच्या ताब्यात आला. 

गेल्या पाच वर्षात ५०० कोटी रुपयाची विकासकामं केल्याचा दावा विद्यमान आमदारांनी केला आहे.
- लोकसहभागातून नदीची खोली वाढवली
- ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर केली
- टंचाईग्रस्त गावे ट्रंकर मुक्त केली.
- ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्ज सुधारावा म्हणून गरुड झेप प्रकल्प  लोकसहभागातून राबविण्यात यश आलं..
अशी विविध विकास कामे केल्याचा दावा विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांनी केलाय..

विरोधकांनी मात्र बोंद्रेंचा हा दावा खोडून काढला आहे. विद्यमान आमदारांकडून विकासाचा दावा केला जात असला तरी चिखली विधानसभा मतदारसंघातील काही प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत.

समस्या
- खामगाव- जालना मार्गाचे काम रखडले
- चिखली शहरात पाणी टंचाई
- रस्त्यांची दूरवस्था
- चिखली - खामगाव रेल्वे मार्गासाठी निधी
  
या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांना आगामी निवडणूक सोपी नसल्याचं राजकीय जाणकारांना वाटतयं. चिखली विधासभा मतदार संघात भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या स्वभिमानी पक्षानेही या मतदार संघावर दावा केला आहे. त्यामुळे विरोधकांमधील ही अंतर्गत दुफळी राहुल बोंद्रे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.