Surprise : या चित्रपटात दिसेल सलमानचा शर्टलेस अवतार...

तुम्ही 'बजरंगी भाईजान' ची वाट पाहताय??  जर पाहत असाल तर आम्ही तुमची उत्सुकता अजून वाढवणार आहोत. या चित्रपटात आता अजून एक ट्विस्ट जोडला जाणार आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटाप्रमाणे बजरंगी भाईजानमध्येही सलमान आपल्याला शर्टलेस दिसणार आहे.

Updated: Jun 5, 2015, 07:37 PM IST
Surprise : या चित्रपटात दिसेल सलमानचा शर्टलेस अवतार... title=

मुंबई : तुम्ही 'बजरंगी भाईजान' ची वाट पाहताय??  जर पाहत असाल तर आम्ही तुमची उत्सुकता अजून वाढवणार आहोत. या चित्रपटात आता अजून एक ट्विस्ट जोडला जाणार आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटाप्रमाणे बजरंगी भाईजानमध्येही सलमान आपल्याला शर्टलेस दिसणार आहे.

कबीर खानने नुकताच या चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन शूट केलाय. या सीनमध्ये सलमान आपल्या लोकप्रिय शर्टलेस लूकमध्ये दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सलमानने आपल्या बॉडीवर खूप मेहनत घेतली आहे.

सलमानला आपली बॉडी अगदी परफेक्ट दाखवायची आहे. यासाठी सलमान दिवसातून तीन तीन वेळा वर्कआऊट करतोय आणि डाएटही तत्परतेने घेतोय. सलमानची परफेक्ट बॉडी पाहून सेटवरील सारेच आश्चर्यचकित झालेत.

बजरंगी भाईजानमध्ये सलमान खानसोबत करीना कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दिकी मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा प्रोमो नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.