आमीर खान हमसून-हमसून रडला, ट्विटरवर टिवटिवाट

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान पुन्हा रडला.. तो ही 'कट्टी-बट्टी' हा सिनेमा पाहून... निखिल अडवाणी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'कट्टी-बट्टी'त कंगना राणावत आणि इमरान खान मुख्य भूमिकेत आहेत.

Updated: Aug 24, 2015, 09:11 PM IST
आमीर खान हमसून-हमसून रडला, ट्विटरवर टिवटिवाट  title=
सौजन्य- यू ट्यूब

मुंबई: मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान पुन्हा रडला.. तो ही 'कट्टी-बट्टी' हा सिनेमा पाहून... निखिल अडवाणी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'कट्टी-बट्टी'त कंगना राणावत आणि इमरान खान मुख्य भूमिकेत आहेत.

निखिल अडवाणीनं सांगितलं, चित्रपटातील अखरेचे 22 मिनीटं पाहून आमीरच्या डोळ्याला धार लागली होती आणि त्याचे डोळे रडून लालेलाल झाले होते. ट्विटरवर मात्र आमीरच्या रडण्याची खिल्ली उडवली गेली.

आज पहिल्यांदाच नाही तर कट्टी-बट्टीच्या स्क्रीनिंगनंतर जेव्हा तब्बल 10 दिवस आमीर माझ्यासोबत बसायचा, तेव्हा ते दृश्य आल्यावर तो दररोज रडायचा, असं निखील अडवाणीनं सांगितलं. 

गेल्या महिन्यात आमीरनं जेव्हा सलमानचा 'बजरंगी भाईजान' पाहिला, तेव्हाही डोळे पुसायला आमीरला टॉवेल घ्यावा लागला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.