समुद्रात सापडलं खजिना असलेलं जहाज

 कोलंबियामध्ये स्पेनचं एक ऐतिहासिक जहाज सापडलं आहे. ज्यामध्ये अरबो डॉलर रूपयांचा खजिना असल्याचं सांगितलं जात आहे. 

Updated: Dec 5, 2015, 02:33 PM IST
समुद्रात सापडलं खजिना असलेलं जहाज title=

कोलंबिया :  कोलंबियामध्ये स्पेनचं एक ऐतिहासिक जहाज सापडलं आहे. ज्यामध्ये अरबो डॉलर रूपयांचा खजिना असल्याचं सांगितलं जात आहे. 

कोलंबियाचे राष्ट्रपती खुआन मॅनुअल सैंतोस यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'एक मोठी बातमी आहे, आम्हाला जुनं जहाज सेन जोस सापडलं आहे. याची अधिक माहिती कार्टाहेना येथे पत्रकार परिषद घेऊन देण्यात येईल.'

१७०८ साली या जहाजाला स्पॅनिश उत्तराधिकार युद्धाच्या दरम्यान ब्रितानी जहाजांनी बुडवलं होतं.  असं म्हटलं जातंय की या जहाजात सोने, चांदीची नाणी असू शकतात. कारण एका देशातून दुसऱ्या देशात खजिना नेण्यासाठी जहाजांचा वापर केला जायचा. पण नैसर्गिक आपत्ती आल्यास ही जहाजं कधी कधी डुबलीही जात होती.  त्यामुळे आता त्यात नेमकं काय असेल याबाबतची उत्सूकता अनेकांना पडली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.