तिरुअनंतपुरम : मूळच्या केरळच्या असणाऱ्या पण, कामासाठी दुबईत असणाऱ्या तीन कामगारांनी आपल्या कुटुंबीयांकडे एक धक्कादायक व्हिडिओ पाठवत आपल्याला मदत करण्याची मागणी केलीय.
या व्हिडिओमध्ये एक सौदी व्यक्ती मूळ भारतीय कामगारांना क्रूरतेनं मारहाण करताना दिसतोय. धक्कादायक म्हणजे, अशा प्रकारचं हे काही पहिलंच प्रकरण नाही, याआधीही अशी प्रकरणं समोर आली होती.
व्हिडिओ : सौदी अधिकाऱ्याची भारतीयाला क्रूर मारहाण
बी विमल कुमार, अभिलाश गोपी आणि बायजू बापू अशी या तीन भारतीयांची नावं आहेत. उत्तर केरळमध्ये हरीपाद नावाच्या गावातून पोटापाण्यासाठी ते दुबईला गेलेत.
अधिक वाचा - अमेरिका पोलिसांची भारतीय वृद्धाला अमानूष मारहाण
एका पोलीसाच्या मध्यस्थीतून त्यांची एका एजन्टशी ओळख झाली आणि या एजन्टकडून त्यांना परदेशी नोकरी आश्वासन मिळालं. प्रकरण समोर आल्यानंतर या पोलिसाला सध्या निलंबीत करण्यात आलंय.
दरम्यान, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या कामगारांना मदतीचं आश्वासन दिलंय.