न्यू यॉर्क: सध्या संपूर्ण जगभरात सेल्फीची क्रेझ आहे. पण आपल्याला माहितीय? सर्वात पहिला सेल्फी कधी काढला गेला?
१८३९ साली ३० वर्षीय रॉबर्ट कॉर्नेलियसनं जगातील सर्वात पहिला सेल्फी काढला गेला होता. अमेरिकेच्या पेंसिलवेनियामध्ये असलेल्या कॉर्नेलियसनं फिलँडेल्फियात राहणाऱ्या आपल्या वडिलांच्या दुकानामागे हा फोटो काढला होता.
कॉर्नेलियसनं फोटोग्राफीमध्ये प्रशिक्षण आणि विशेषत्व: मिळविल्याच्या २० वर्षांपर्यंत आपल्या वडिलांच्या दुकानात काम केलं. त्यांची फोटोग्राफी कंपनी अमेरिकेतील सर्वात मोठी फोटोग्राफी कंपन्यांमध्ये एक आहे. कॉर्नेलियस यांचं १८९३मध्ये निधन झालं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.