काहिरा: इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी आणि अन्य १०० जणांना न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. याआधी एका वेगळ्या प्रकरणात मोर्सी यांना २० वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे.
न्यायाधिशांनी शिक्षा सुनावत होते त्यावेळी मोर्सी यांना राग अनावर झाला होता, असं सांगण्यात येत आहे. शिक्षा सुनावलेल्यापैकी अनेक जणांना अटक झालेली नाही. त्यात मुस्लिम समाजातील विद्वान युसूफ अल करादवी यांचाही समावेश आहे.
इजिप्तमधील कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर या निर्णयावर सल्ला मागवण्यासाठी इथल्या मुफ्ती सरकारकडे पाठवण्यात येतो. तिखल्या मुफ्ती सरकारच्या सल्लागार असलेल्या व्यक्तीकडून मुस्लिम कायद्यानुसार या निर्णयावर सल्ला घेतला जातो. त्यानंतर मुफ्ती सरकारकडून यावर योग्य तो निर्णय देण्यात येतो. या निर्णयानंतरच २ जूनला कोर्ट अंतिम निकाल सुनावणार आहे.
२०१३ साली मोर्सी यांना लष्करानं सत्तेतून बेदखल केलं होतं. त्यावेळी देशभरात त्यांच्या विरोधात प्रदर्शनं सुरू होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.