विचित्र सेक्सने गेला जीव!

लंडनमध्ये वॉबान किल्लाच्या तटबंदीजवळ सेक्स करताना एका जोडप्याने जीव गमावला. किल्ल्याच्या तटबंदीजवळ सेक्स करताना या जोडप्याचा तोल जाऊन ते ४० फूट खोल दरीत कोसळले. 

Updated: Aug 25, 2015, 06:00 PM IST
विचित्र सेक्सने गेला जीव! title=

लंडन : लंडनमध्ये वॉबान किल्लाच्या तटबंदीजवळ सेक्स करताना एका जोडप्याने जीव गमावला. किल्ल्याच्या तटबंदीजवळ सेक्स करताना या जोडप्याचा तोल जाऊन ते ४० फूट खोल दरीत कोसळले. 

द इंडिपेंडंंट या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार वॉबान किल्ल्याच्या दरीत नग्नावस्थेत या प्रेमी युगुलाचे मृतदेह सापडले. 

आणखी वाचा : सेक्स लाईफ सुधारण्यासाठी मेथी उपयुक्त

लंडनजवळ व्हॅबन येथे ऐतिहासिक किल्ला असून या किल्ल्यालगतच्या खोल दरीत एक प्रेमी युगूल मृतावस्थेत आढळले. यावेळी हे युगूल विवस्त्र अवस्थेत होते. दरम्यान याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्यांचे कपडे किल्ल्यावरील तटबंदीवर सापडले असून किल्ल्यातील एकांताचा फायदा घेत दोघेही सेक्स करत असताना त्यांचा सेक्सच्या नादात तोल जाऊन दरीत कोसळले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. 

आणखी वाचा : रात्री महिला आणि सकाळी पुरूषांना हवा असतो सेक्स

तसेच, हे दोघे मुळचे फ्रान्सचे नागरिक असल्याचे सांगण्यात येत असून या तरुण -तरुणीचे वय ३० वर्ष असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस आणखी तपास करत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.