लंडन : मानवाला नेहमी काही तरी वेगळ करण्याची इच्छा असते. असे काही तरी वेगळ करण्यासाठी ब्रिटनमध्ये १०३ वर्षांचा वर आणि ९९ वर्षांची वधू शनिवारी विवाहबद्ध झाले आहेत.
या विवाहानंतर इतक्य वयात लग्न करणारी ही पहिली जोडी ठरली आहे. जॉर्ज किर्बी आणि डोरीन लुकी अशी नव दाम्पत्यांची नावे आहेत. लग्नानंतर पतीला पत्नीने व्हीलचेअरवरून नेले. दोघांचे वय एकत्र केल्यास ते १९४ वर्षे होते.
जॉर्ज किर्बी यांचा १३ जूनला १०३वा वाढदिवस होता. त्यानिमित्त इस्टबर्न येथील एका हॉटेलमध्ये या दोघांनी विवाह केला. या समारंभास कुटुंबातील सदस्य आणि मित्र कंपनी असे ५० जण उपस्थित होते. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचा प्रतिनिधी विवाहाचा साक्षीदार म्हणून उपस्थित होता.
या दाम्पत्याला आहेत ७ मुले, १५ नातवंडे
गेल्या २७ वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत होते. माजी बॉक्सर असणाऱ्या किर्बी यांनी व्हॅलेंटाईन डेला आपल्या दीर्घकाळच्या मैत्रिणीला विवाहासाठी विचारले होते. या दाम्पत्याला ७ मुले, १५ नातवंडे व ७ परतवंडे आहेत. आपण लवकर विवाह केला नाही, याबद्दल आम्हाला काही खेद वाटत नाही. कारण तेव्हा आम्हाला लग्नाचे महत्त्व कळत नव्हते, आता लग्न करावेसे वाटले म्हणून विवाहबंधनात अडकलो असे किर्बी यांनी सांगितले. डोरीनच्या सहवासात मी आजही तरुण आहे, असेही त्यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.