www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बनावट पॅनकार्ड बनवून फसविण्याचे अनेक प्रकार उघडकीस आलेत. या प्रकरणांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. आता जर तुम्हाला पॅनकार्ड काढायचे असेल तर तुमचा जन्म दाखला मस्ट आहे.
बनावट पॅनकार्ड विरोधी मोहिमेत आयकर विभाग पॅनकार्ड बनवण्यासाठी जन्माचा दाखला अनिवार्य करण्याचा विचार करतेय. आता जर तुम्हाला पॅनकार्ड बनवायचे असेल तर तुम्हाला जन्माचा दाखला देण्याची गरज लागेल. रेशन कार्ड अथवा घराची भाडेपावती पत्त्याच्या पुरावा म्हणून घेतले जाणार नाही, असे वित्त मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं.
काही फसवण्याच्या प्रकरणामध्ये लोकांनी बनावट रेशन कार्ड अथवा भाडे पावती सादर करून पॅनकार्ड मिळवले आहे. आतापर्यंत डिपॉजिटरी अकाउंट स्टेटमेंट, बँक स्टेटमेंट, पासबुक, रेशन कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, प्रॉपर्टी टॅक्सचे मुल्यांकन तसेच अन्य आवश्य दस्तावेज ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून घेतले जात होते. आता यापुढे हे चालणार नाही. पॅन काढण्यासाठी जन्म दाखला अनिर्वाय होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.