बंगळुरु : बंगळुरुची रहिवासी सुमन ही अवघ्या २७ वर्षांची. आपला पती रोज रात्री घरी उशिरा येऊन अंघोळ करतो, आणि पूजा करतो या गोष्टी तिला खटकू लागल्या. मात्र गर्भावस्थेत असल्यामुळे तिने याबाबत चर्चा करणे टाळले.
का संशय आला पत्नीला
एक महिन्यापूर्वीच सुमनच्या पतीच्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला त्या मेसेजवरून तिला कळले की, तीच्या पतीचे काही एस्कॉर्ट्स आणि संबंधित दलालांबरोबर संपर्क आहेत. तिने पतीला अनेकदा रंगेहात देखील पकडले होते.
कोणाची घेतली मदत
'बंगळुरु मिरर'च्या वृत्तानुसार सुमनने 'वनीता सहायवनी' या पोलिसांमार्फत सुरू असलेल्या हेल्पलाइनशी याबाबत संपर्क साधला. सुमनचे लग्न २०१३ साली अक्षय शर्मासोबत झाले. दोघेही इंजीनियर आहेत. सुमन प्रेग्नंट होण्याआधी सर्वकाही सुरळीत सुरू होते. त्यानंतर पतीचे रोज रात्री उशिरा येणे, त्यासाठी रोज वेगवेगळी कारणे देणे, रात्री घरी आल्यावर अंघोळ करणे या गोष्टी खटकू लागल्या. म्हणून तिने या सगळ्या गोष्टींची माहिती काढण्याचे ठरवले.
कसे पकडले रंगेहात
एक दिवशी संधी साधून पती अंघोळ करत असतांना सुमनने पतीचा फोन चेक केला. त्यात तीला व्हॉट्सअॅपवर एक महिलेचा मेसेज दिसला. मात्र त्यावर फोन केला असतांना समोरून फोन कट करण्यात आला. हतबल झालेल्या सुमनने अखेर खबऱ्याची मदत घ्यायचे ठरवले. तेव्हा तिला समजले की तीचा पती एस्कॉर्ट्सच्या संपर्कात आहे. तिने मँगलोरपर्यंत पतीचा पिछा केला आणि एस्कॉर्ट्ससकट पतीला रंगेहात पकडले.
सुमनने रडत न बसता पतीविरोधात पुरावे घेतले आणि पतीबरोबरच्या सगळ्यांची पोलिसांकडे तक्रार केली. पतीचे सध्या काउन्सलिंग सुरू आहे आणि त्याने आपल्याकडून चूक झाल्याचेही कबूल केले आहे.