प. बंगालमध्ये पुरात गेली बस वाहून

प. बंगालमध्ये बांकुरा जिल्ह्यातील झरगाम येथून दुर्गापूर येथे बस जात होती. भैरव बाकी नदी पार करीत असताना आलेल्या पुराच्या लोंढ्यात बस वाहून गेली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 6, 2012, 09:44 PM IST

ww.24taas.com,बांकुरा
पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. प. बंगालमधील बांकुरा जिल्ह्यात ढगफुटीमुळे नद्यांना पूर आला आहे. नदीला आलेल्या पुरात १०० प्रवाशाना घेऊन जाणारी बस वाहून गेली. १२ प्रवाशांना वाचविण्यात यश आल्याचे वृत्त आहे.
बांकुरा जिल्ह्यातील झरगाम येथून दुर्गापूर येथे बस जात होती. भैरव बाकी नदी पार करीत असताना आलेल्या पुराच्या लोंढ्यात बस वाहून गेली. १०० प्रवाशांपैकी बारा जणांना वाचवण्यात आले आहे. मात्र, बाकीचे प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत.
ढगफुटीमुळे पश्‍चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यात ठिकठिकाणी पूर आला आहे. सखल भागांमध्ये पुराचे पाणी अडकून पडल्याने अनेक गावांची संपर्क तुटला आहे.