नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षेत पहिल्या चार जागांवर मुलींनीच कब्जा मिळवलाय. पण, यामध्ये सर्वात जास्त चर्चा होतेय ती देशात पहिल्या आलेल्या इरा सिंघल हिची...
यूपीएससीच्या या परीक्षेला १ हजार २३६ उमेदवार बसले होते. या सर्वांना मागे टाकत इरा देशात पहिली आलीय. विशेष म्हणजे, इरा सिंघल या शारिरीकदृष्ट्या अपंग आहेत. आपल्या अपंगत्वावर मात करून जनरल कॅटेगरीमध्ये पहिली येत त्यांनी हे निर्भेळ यश मिळवलंय.
तशी इरानं २०१० सालीही यूपीएसी परीक्षेत यश मिळवलं होतं पण त्यावेळी ती ८१३ व्या क्रमांकावर होती. यश मिळाल्यानंतरही 'शारीरिक अक्षमते'चं कारण पुढे करत तिची नियुक्ती नाकारण्यात आली होती. इराचे हात इतर सामान्य लोकांच्या तुलनेत कमजोर असल्याचं सांगण्यात आलं होतं.
इरा ही राजेंद्र आणि अनिता सिंघल यांची एकुलती एक मुलगी... इराची उंची अवघी ४.५ फूट आहे.
पण, इरानं हार मानली नाही. सरकारी विभागाच्या या निर्णयाविरुद्ध तिनं २०१२ रोली 'कॅट'कडे (सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनल) दाद मागितली. दोन वर्षांपर्यंत या केसची सुनावणी सुरू होती.... आणि २०१४ साली या प्रकरणाचा निकाल इराच्या बाजुनं लागला.
सध्या इरा आयआरएस ऑफिसर आहे आणि कस्टम विभागात ती असिस्टंट कमिशनर म्हणून काम पाहतेय. यातच तिनं यूपीएससीची तयारी देखील केली. आयएएस होऊन इराला अपंगांसाठी काम करायचंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.