'रेल्वेपेक्षा स्वस्त विमान प्रवास, फक्त ५९९ रुपयात

हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा एवढी वाढलीय, की रेल्वेच्या सेकंड क्लासपेक्षा विमानाचं तिकीट कमी स्कीममध्ये कमी झालंय. कारण स्पाईसजेटने एक अनोखी आणि स्वस्त योजना आणली आहे. 'रेल्वेपेक्षा स्वस्त प्रवास' या घोषणेसह विमान प्रवासाच्या तिकिटाचे दर हे केवळ 599 रुपये ठेवण्यात आले आहे.

Updated: Feb 11, 2015, 03:44 PM IST
'रेल्वेपेक्षा स्वस्त विमान प्रवास, फक्त ५९९ रुपयात title=

नवी दिल्ली : हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा एवढी वाढलीय, की रेल्वेच्या सेकंड क्लासपेक्षा विमानाचं तिकीट कमी स्कीममध्ये कमी झालंय. कारण स्पाईसजेटने एक अनोखी आणि स्वस्त योजना आणली आहे. 'रेल्वेपेक्षा स्वस्त प्रवास' या घोषणेसह विमान प्रवासाच्या तिकिटाचे दर हे केवळ 599 रुपये ठेवण्यात आले आहे.

स्पाइसजेटची ही अनोखी आणि नवी सवलत 1 जुलै ते 24 ऑक्‍टोबर 2015 दरम्यान लागू केली जाणार आहे. त्यासाठी 11 ते 13 फेब्रुवारी (दोन्ही दिवसांसह) दरम्यान तिकीटे आरक्षित करणे आवश्‍यक आहे.

या सवलती अंतर्गत आरक्षित केलेली तिकीट रद्द करता येणार नाहीत, असे स्पाईसजेटने कळविले आहे. तसेच "रेल्वेपेक्षाही स्वस्त प्रवास‘ असे या सवलतीच्या तिकिटा योजनेला नाव म्हटले आहे.

उन्हाळी सुट्यांमुळे जानेवारी ते मार्च तसेच जुलै ते सप्टेंबर हा कालावधी प्रवासी कंपन्यांसाठी अधिक व्यवसाय मिळवून देणारा कालावधी समजला जातो. त्यामुळे या कालावधीत प्रवासी कंपन्या अनेक सवलती जाहीर करत असतात.

अलिकडेच स्पाइसजेटने 'भव्य सवलत' योजनेअंतर्गत केवळ 1499 रुपये असलेली सवलतीच्या दरातील तब्बल पाच लाख तिकिटे उपलब्ध करून दिली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.