नवी दिल्ली: चित्रपटगृहांमध्ये आता सरकारच्या कामगिरीवर आधारित लघुपट झळकणार आहेत. प्रत्येक चित्रपट सुरू होण्यापूर्वी हे लघुपट दाखविणे बंधनकारक असणार आहे.
यामध्ये सरकारने केलेल्या योजनांवर भर देण्यात येणार आहे. याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून, विशेषतः एनिमेशनपटांद्वारे आधीची परिस्थीती आणि आताची परिस्थिती मांडण्यात येणारे. याबाबत प्रत्येक ठिकाणच्या खासदारांनी विशेष पुढाकार घेण्याच्या सूचना देण्यात आल्यायेत.
तसंच प्रत्येक मंत्र्याने पुढाकार घेऊन, मुलाखती देऊन सरकारची कामगिरी या लघुपटांद्वारे मांडावी अशा सूचनाही देण्यात आल्याचं समजतंय.