टूजी घोटाळा : सीबीआय अध्यक्षांची हकालपट्टी!

सीबीआयचे डायरेक्टर रणजीत सिन्हा यांना आज फार मोठा दणका मिळाला. सिन्हा यांनी टूजी घोटाळ्याच्या चौकशीतून दूर व्हावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Updated: Nov 20, 2014, 08:49 PM IST
टूजी घोटाळा : सीबीआय अध्यक्षांची हकालपट्टी!  title=

नवी दिल्ली : सीबीआयचे डायरेक्टर रणजीत सिन्हा यांना आज फार मोठा दणका मिळाला. सिन्हा यांनी टूजी घोटाळ्याच्या चौकशीतून दूर व्हावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सिन्हा यांनी चौकशीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. सिन्हा यांना चौकशीतून हटवण्याचं नेमकं कारण मात्र न्यायालयाने सांगितलं नाही. ते कारण उघड केल्यास सीबीआयची प्रतिमा डागाळेल असं न्यायालयाने म्हटलंय.

टूजी घोटाळ्यातल्या आरोपींची सिन्हा यांनी वारंवार भेट घेतली होती, असा आरोप एका एनजीओनं केला होता. त्यात प्रथमदर्शनी तथ्य दिसत असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. 

टूजी घोटाळ्याची चौकशी आता दुसऱ्या एखाद्या वरीष्ठ सीबीआय अधिकाऱ्याकडून व्हावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.