लखनऊ : बांग्लादेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी इस्लाम धर्मप्रचारक झाकिर नाईक यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचं म्हटलं... आणि त्यानंतर डॉ. झाकीर नाईक वादात अडकले... हेच झाकीर नाईक आता हिंदू संघटनांच्या टार्गेटवर आलेत.
झाकीर नाईक यांचं मुंडकं छाटणाऱ्याला तब्बल ५० लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय.... आणि हे बक्षीस जाहीर केलंय स्वत:ला 'साध्वी' म्हणवून घेणाऱ्या प्राचीनं...
साध्वी प्राची हिचे याआधीचेही अनेक वक्तव्य वादग्रस्त ठरले आहेत. 'पळपुट्या झाकीरचं मुंडकं देशातील सर्वात उंच टॉवरवर चढवलं जाईल तेव्हा त्याच्या समर्थकांना धडा मिळेल' असं चिथावणी देणारं वक्तव्य साध्वी प्राची हिनं दिलंय.
झाकीर जिथंही असेल तिथून भारत सरकारनं त्याला खेचून आणायला हवं... आणि त्याचं मुंडकं छाटायला हवं.... जे धर्मगुरु झाकिर नाईकचा विरोध करत आहेत ते केवळ नाटक करत आहेत, असंही साध्वी प्राचीनं म्हटलंय.