नोबेल विजेते पर्यावरण तज्ज्ञ आर. के. पचौरींवर लैंगिक छळाचा आरोप

‘दी एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ अर्थात टेरीचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते आर. के. पचौरी यांच्याविरोधात टेरीच्याच एका महिला कर्मचाऱ्यानं लैंगिक छळाचा आरोप केलाय. पीडित महिलेनं पचौरिंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी याप्रकरणी पचौरींना गुरुवारी समन्स धाडलं होतं. 

Updated: Feb 20, 2015, 12:08 PM IST
नोबेल विजेते पर्यावरण तज्ज्ञ आर. के. पचौरींवर लैंगिक छळाचा आरोप   title=

नवी दिल्ली: ‘दी एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ अर्थात टेरीचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते आर. के. पचौरी यांच्याविरोधात टेरीच्याच एका महिला कर्मचाऱ्यानं लैंगिक छळाचा आरोप केलाय. पीडित महिलेनं पचौरिंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी याप्रकरणी पचौरींना गुरुवारी समन्स धाडलं होतं. 

दरम्यान त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यास सहकार्य करण्याचं आश्वासनही पचौरींनी कोर्टासमोर दिलं आहे.

सप्टेंबर २०१३मध्ये आपण टेरीमध्ये दाखल झाल्यानंतर दोन वर्षे पचौरी यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. पचौरी इमेल आणि एसएमएसद्वारे आपला लैंगिक छळ करत असल्याची तक्रार या महिलेनं केलीय.
 
दोन दिवसांपूर्वी एका २९ वर्षीय महिलेनं त्यांच्याविरोधात अश्लील एसएमएस करून लैंगिक छळ केल्याची तक्रार केली होती. संबंधित महिला ७५ वर्षीय पचौरींची ज्युनिअर म्हणून कार्यरत आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.