गोमूत्रापासून वीज निर्मिती

गोमूत्रापासून वीज निर्मिती... हे शक्य वाटतं का?... मात्र राजस्थानमधल्या एका शालेय विद्यार्थिनीनं हा प्रयत्न साकारलाय. तिच्या या प्रकल्पाची, जपानमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

Updated: Feb 23, 2015, 03:54 PM IST
गोमूत्रापासून वीज निर्मिती title=

राजसमंद : गोमूत्रापासून वीज निर्मिती... हे शक्य वाटतं का?... मात्र राजस्थानमधल्या एका शालेय विद्यार्थिनीनं हा प्रयत्न साकारलाय. तिच्या या प्रकल्पाची, जपानमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

गोमूत्रापासून वीज !... ऐकायलाच आश्चर्यकारक वाटतंय. मात्र १३ वर्षांच्या साक्षी दशोरा हिनं याबाबत यशस्वी वैज्ञानिक प्रकल्प तयार केलाय.

राजस्थानमधल्या राजसमंद इथल्या आठव्या इयत्तेतल्या साक्षी दशोरानं, गोमूत्रातल्या वैशिष्ट्यांचा वापर केला. गोमूत्रात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नीशियम आणि सल्फर हे घटक मुलभूत स्वरुपात असतात. यावर तिने गोमूत्रात कॉपर आणि ऍल्युमिनियची इलेक्ट्रोड टाकून वीज बनवली आणि तारेने जोडलेल्या एलईडी घड्याळाला पेटवलं.

साधी दशोराच्या या प्रकल्पानं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा पुरस्कार पटकावला आहे. आणि २ महिन्यांनंतर जपानमध्ये होणा-या विज्ञान परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाणाराय.

गोमूत्रानं कर्करोगासारखे आजार बरे केले जाऊ शकतात असा दावा, अनेक वर्षांपासून केला जातोय. मात्र अवघ्या १३ वर्षांच्या साक्षीनं गोमूत्राच्या उपयुक्ततेचा आणखी एक भाग जगासमोर आणलाय. भविष्यासाठी हे नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.