नवी दिल्ली : काँग्रेसने काळा पैशावर लगाम लावण्याच्या प्रयत्नांचे समर्थन केले पण या प्रकारवर काही प्रश्न उपस्थित केले आहे. पक्षाचे म्हणणे आही ५०० आणि १००० रुपयांच्या नोट बंद करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सरकारने हे निश्चित केले पाहिजे की सामन्य नागरिकांना सहजतेने नोट बदली करून मिळतील. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले की, श्रीमान मोदी यांनी एकदा पुन्हा दाखवून दिले की त्यांना सामान्य नागरिकांची चिंता कमी आहे.
राहुल गांधी यांनी आश्चर्य व्यक्त केले की २ हजार रूपयांची नवीन नोट आणून काळ्या पैशाची जमाखेरी कशी दूर होईल. सरकारने शेतकरी, गृहिणी आणि छोट्या दुकानदारांना गोंधळात टाकले आहेत. खरे दोषी परदेशात काळा पैसा लपवून ठेवणारे आहेत. तसेच रिअल एस्टेटमध्ये काळा पैसा दाबून बसणारे आहेत. खूप चांगले केले श्रीमान मोदी... अशी उपरोधीक टीकाही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केली आहे.
माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटले की ९९ टक्के लोकांकडे वैध धन आहे. या लोकांना सहजपणे नोटा बदलून दिल्या पाहिजे. या प्रक्रियेत १५ ते २० हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
चिदंबरम म्हटले की काळा पैसा कोणाकडे रोखीत नाही. असे पुरावे आहेत की काळा पैसा रिअल एस्टेट, सराफा किंवा शेअर बाजार आणि दागिन्यात गुंतवला आहे. प्रत्येक व्यक्तीकडे पाचशे किंवा हजार रुपयांच्या एक दोन नोटा असतील तर असे दहा पैकी नऊ जण असतील त्यांना सर्वांना सहज नोटा बदलून मिळाल्या पाहिजे.
पी. चिदंबरम यांनी म्हटले की या निर्णयाने काळा पैसा कमी होण्याची शक्यता कमी आहे. कारण हा प्रयोग १९७८ मध्ये करण्यात आला होता. तो अयशस्वी ठरला होता.