दिवाळीनंतर निघणार दिवाळं, पेट्रोल-डिझेल महागलं

दिवाळी संपताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून पेट्रोलच्या दरात प्रति लीटरमागे ३६ पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लीटरमागे ८७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्री १२ वाजेपासून ही नवीन दरवाढ लागू होणार आहे. 

Updated: Nov 15, 2015, 06:36 PM IST
दिवाळीनंतर निघणार दिवाळं, पेट्रोल-डिझेल महागलं title=

नवी दिल्ली: दिवाळी संपताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून पेट्रोलच्या दरात प्रति लीटरमागे ३६ पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लीटरमागे ८७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्री १२ वाजेपासून ही नवीन दरवाढ लागू होणार आहे. 

रविवारी संध्याकाळी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जाहीर केले आहेत. दिवाळीत डाळ आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्यानं सर्वसामान्यांच्या दिवाळं निघालं होतं. आजपासून सेवा करासोबतच अतिरिक्त ०.५ टक्के स्वच्छ भारत अधिभार लागू झाल्यानं रेल्वेप्रवासही महागला आहे. 

त्यापाठोपाठ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांना महागाईचे चटके सोसावे लागतील असं दिसतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.