नवी दिल्ली : टपाल कार्यालयांना बँकांचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.
टपाल कार्यालयांना आता इंडिया पोस्ट पेमेंट बँक असं म्हटल जाईल. टपाल बँकांचे कामकाज मार्च 2017 पासून सुरु होणार आहे.
दरम्यान, आता तांदुळाला चौदाशे सत्तर रुपयांचा दर मिळणार आहे. कारण बैठकीत तांदुळाच्या किमान आधारभूत किमतीत प्रतिक्विंटल ६० रुपयांनी वाढ करण्यात आली.