अभ्यासक्रमाचा घोळ दूरहोईपर्यंत यूपीएससी परीक्षा पुढे ढकला

'यूपीएससी'च्या पूर्वपरीक्षेबाबत अभ्यासक्रमातला घोळ दूर होत नाही, तोवर परीक्षा पुढे ढकलावी अशी विनंती सरकारने यूपीएससीला केलीय. 

Updated: Jul 15, 2014, 06:21 PM IST
अभ्यासक्रमाचा घोळ दूरहोईपर्यंत यूपीएससी परीक्षा पुढे ढकला title=

नवी दिल्ली : 'यूपीएससी'च्या पूर्वपरीक्षेबाबत अभ्यासक्रमातला घोळ दूर होत नाही, तोवर परीक्षा पुढे ढकलावी अशी विनंती सरकारने यूपीएससीला केलीय. 

पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली. यूपीएससीच्या अभ्यासक्रमात असलेल्या घोळामुळे परीक्षार्थ्यांत संदीग्धतेचं वातावरण आहे.

ही परीक्षा 21 ऑगस्ट 2014 या दिवशी होणार आहे. सिव्हील सर्व्हीस ऍप्टीट्यूड टेस्ट म्हणजेच सी सॅट ही परीक्षा रद्द करण्याची परीक्षार्थींची मागणी आहे. 

या परीक्षेला विरोध करणा-यांनी काल राजनाथ सिंग यांच्या घराबाहेर निदर्शनं केली. हिंदी मीडियममध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांशी सी सॅट परीक्षेमुळे भेदभाव निर्माण होत असल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.