www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई,
गॅस सिलेंडरची दरवाढ १ एप्रिलपासून करण्यास निवडणूक आयोगानं नकार दिलाय. आयोगानं याबाबत पेट्रोलियम सचिवांना पत्र लिहलंय.
आयोगाच्या या निर्देशानंतर गॅसच्या किंमती निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाढवू नये अशी सूचना केंद्र सरकारनं गॅस कंपनींना केली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे गॅसच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय आता नव्या सरकारच्या कोर्टात गेलाय.
गॅस दराच्या वाढीच्या निर्णयाच्या विरोधात रिलायन्स कंपनी आणि पेट्रोलियम मंत्रालयाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. या निर्णयामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होत असून मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला फायदा व्हावा यासाठी हाच निर्णय घेण्यात आल्याची तक्रार आयोगाकडे करण्यात आली होती. त्यामुळे सध्यातरी ग्राहकांना गॅस दरवाढीतून सुटका मिळणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.