येडीयुरप्पांच्या नव्या पक्षाची आज घोषणा

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा आज औपचारिकपणे कर्नाटक जनता पार्टी या पक्षाची स्थापना करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपनं येडीयुरप्पा यांच्या समर्थकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 9, 2012, 11:48 AM IST

www.24taas.com, बंगळुरू
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा आज औपचारिकपणे कर्नाटक जनता पार्टी या पक्षाची स्थापना करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपनं येडीयुरप्पा यांच्या समर्थकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारलाय.
येडीयुरप्पा समर्थक खासदार जी. एस. बसवराज आणि सहकारमंत्री बी. जे. पुट्टस्वामी यांना पक्षातून निलंबित करण्यात आलाय. हे दोघेही येडीयुरप्पा यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. इतर समर्थकांना संदेश देण्यासाठीच पक्षानं हे कठोर पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.
आपल्या समर्थकांवर अशी कारवाई केली तर कर्नाटकातलं भाजप सरकार सत्तेवर राहणार नाही, असा इशारा येडीयुरप्पा यांनी दिलाय. समर्थकांनी तूर्त भाजपमध्येच राहवं असा येडीयुरप्पांचं मत आहे.
मात्र आजच्या पक्ष स्थापनेच्या कार्यक्रमाला विभानसभेचे ४० आमदार, विधान परिषदेचे २० आमदार तर १० खासदार हजर राहतील असा दावा येडीयुरप्पा यांनी केला आहे.