काळोखात कार उभी, मुलीचा ओरडण्याचा आवाज....

काळोखात एक कार उभी. या कारच्या काचाही बंद. काचाना काळी फ्रेम त्यामुळे कारमध्ये काय चाललेय याचा अंदाज येत नाही. केवळ आवाज येतो. तोहीही मुलीचा. त्यावरुन गाडीत बलात्कार होत असल्याचा अंदाज येतो. या कारजवळ असणारे काही लोक कारमध्ये काय चाललंय याचा मागोवा घेतात. तर काही जण मुलीचा आवाज ऐकूनही तेथून निघून जातात.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 10, 2014, 11:02 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काळोखात एक कार उभी. या कारच्या काचाही बंद. काचाना काळी फ्रेम त्यामुळे कारमध्ये काय चाललेय याचा अंदाज येत नाही. केवळ आवाज येतो. तो ही मुलीचा. त्यावरुन गाडीत बलात्कार होत असल्याचा अंदाज येतो. या कारजवळ असणारे काही लोक कारमध्ये काय चाललंय याचा मागोवा घेतात. तर काही जण मुलीचा आवाज ऐकून कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात. तर काहीजण गप्पपणे तेथून निघून जातात.
कारमध्ये मुलीचा आवाज आल्याने काहीजण गाडीच्या काचेतून पाहाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, काही दिसत नसल्याने तेही गप्प बसत. मात्र, एक 78 वर्षांचे वृद्ध वॉचमन मुलीला वाचविण्यासाठी गाडीच्या काचा तोडण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यांला यश येत नाही. मुलीचा जोरजोराने ओरडण्याचा आवाज येत असतो. तिला वाचविण्यासाठी तेथून जाणारे पुढे येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, `YesNoMaybe` या सोशल एक्सपेरिमेंट यांनी म्हटले आहे की, या कारमध्ये एक प्रि-रेकॉर्डेड ऑडिओ टेप आहे. एक सामाजिक जनजागृतीसाठी हा प्रयत्न आहे. कारमध्ये प्रत्यक्षात मुलगी नाही. यात आश्चर्य़ करण्याची बाब म्हणजे, काही लोक आत काय चाललंय ते पाहण्यासाठी कान लावतात कारला. यात आश्चर्य म्हणजे दोन पोलिसांचा समावेश आहे. एका मुलीवर रेप होत असताना त्या मुलीला वाचविण्यासाठी पुढे येत नाहीत. केवळ पाहातात आणि पुढे निघून जातात. तर काही लोक आवाज ऐकूण तिला वाचविण्याचा प्रयत्न करतात.
टीप - social experiment video

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.