जगात कॅन्सरने सर्वाधिक मृत्यू होतात, या धोकादायक रोगापासून दूर राहण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स आहेत. कॅन्सर शरीरातील पेशींमध्ये झपाट्याने पसरणारा रोग आहे.
Updated: Jan 19, 2016, 12:49 PM IST
मुंबई : जगात कॅन्सरने सर्वाधिक मृत्यू होतात, या धोकादायक रोगापासून दूर राहण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स आहेत. कॅन्सर शरीरातील पेशींमध्ये झपाट्याने पसरणारा रोग आहे.
खालील महत्वाच्या गोष्टी कॅन्सरचा धोका कमी करू शकतात.
सर्वेनुसार कॅन्सरचा धोका व्यायामाने कमी करता येऊ शकतो, यात ब्रेस्ट कॅन्सरचाही समावेश आहे.
वाढणारं वजन कॅन्सरचा धोका वाढवतं, म्हणून नियमित व्यायाम करा, वजन नियंत्रणात ठेवा. वजन वाढल्यास प्रोस्टेट, प्रँकियाज, युट्रेस, ओव्हरी कॅन्सरचा धोका वाढतो. ज्येष्ठ महिलांचं वजन वाढल्याने त्यांच्यात ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो.
बराच वेळ खाली बसणे, खाली वाकणे आणि सतत टीव्ही पाहणे यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
तंबाखू आणि गुटख्याचं सेवन तुम्हाला कॅन्सरकडे घेऊन जातं.
भरपूर हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा जेवणात समावेश करा, जंक फूड खाल्ल्याने कॅन्सर जवळ येण्यास सुरूवात होते.
उन्हाच्या तेज किरणांपासून वाचा, सूर्याच्या अल्टा-व्हायलेट किरणांपासून त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो.
गुटखा, दारू यामुळे तोंडाचा तसेच गळ्याचा कॅन्सर होऊ शकतो.
त्वचेत कोणत्याही प्रकारचा बदल झाल्यास, त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा, हे देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.