मुंबई : आपल्याला काही झालंच नाही आणि काही होणारही नाही, अशा धादांत समजुतीखाली आपण वावरत असतो. पण, गेल्या काही वर्षांपासून तरुण मुला-मुलींमध्येदेखील हृदयविकाराच्या झटक्यानं अकाली जाण्याचं प्रमाण वाढलेलं आपण आपल्या आजुबाजुला पाहिलेलंच असेल.
सैरभैर झालेली जीवनशैली... मग ती तुम्हाला हवीशी असो किंवा नसो... पर्याय नाही... मग, सततची धावपळ... खाण्याच्या-झोपण्याच्या वाईट सवयी आणि शेवटी खूप सारा ताण-तणाव... याचा सरळ सरळ परिणाम जाणवतो तुमच्या हृदयावर...
हृदयविकार आणि त्यावरील उपाय...
हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल ब्लॉक झाल्यानं हृदयविकाराचा धक्का जाणवू शकतो. हे ब्लॉक्स काढण्यासाठी तीन तीन प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात.
१. स्टेन्टिंग
२. अँन्जिओप्लास्टी किंवा
३. बायपास सर्जरी
हार्ट अटॅक आल्यावर पहिल्यांदा काय करता येईल...
* तुम्हाला किंवा तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास जाणवतोय असं लक्षात आल्यानंतर तात्काळ अॅस्पिरीन किंवा डेस्पिरीन टॅबलेट त्या व्यक्तीला द्या... या टॅबलेटस् कोणत्याही जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये सहजासहजी उपलब्ध असतात.
हृदयविकार होऊच नये, यासाठी काय करता येईल...
* जर तुम्हाला धुम्रपान करण्याची सवय असेल तर ती तात्काळ सोडा... मग, यामध्ये एका दिवशी एक की दोन हा प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडू नका.
* अल्कोहोलपासूनही चार हात लांबच राहा.
* नियमित व्यायाम हृदयासाठी आणि एकूणच तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो.
* योग्य प्रमाणात रेड वाईनचं सेवनही हृदयासाठी फायदेशीर ठरतं.
* आपलं वजन आणि शरीरातील कोलेस्टेरॉल प्रमाणात राहील याची काळजी घ्या. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
* ताण-तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी योगा, मेडिटेशन, रिलॅक्सेशनच्या अनेक पद्धती आहेत... त्याचा वापर करा.
डॉक्टरांचा सल्ला घ्या...
* अॅसिडिटी किंवा छातीत दुखत असेल तर आपणचं आपले डॉक्टर होणं टाळा... तज्ज्ञांना गाठून त्यांचा योग्य सल्ला घ्या.
* नियमितपणे तुमच्या शरीराचं संपूर्ण हेल्थ चेक अपही तितकंच गरजेचं आहे. यासाठी, तुम्ही जर ४० वर्षांच्या आत असाल तर तीन वर्षांतून एकदा चेक अप करू शकता... पण, तुमचं वय ४० पेक्षा जास्त असेल तर प्रत्येक वर्षी चेक अप जरुर करून घ्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.