मुंबई : कामसूत्राविषयी आज तुम्ही जाणून घेतलं, तर अनेक गोष्टी तुम्हाला आश्चर्याचा धक्का देतील, कारण कामसूत्रातील अनेक गोष्टी आज बदलत्या काळात पुसट वाटतात. तर काही खऱ्या खुऱ्या.
१) कामसूत्र हे खिस्त पूर्व २०० ते ३०० दरम्यान महर्षी वात्सयान यांनी लिहिलं, एका हिंदू तत्ववेत्याने वेदीक परंपरेत हे लिहिल्याचं सांगण्यात येतं.
२) सर रिचर्ड एफ बर्टन यांनी ते १८७६ मध्ये इंग्रजीत भाषांतरीत केलं, आम्हाला ब्रिटिशांना असं प्रेम करणं माहित नव्हतं, असं बर्टन म्हणतात, कामसूत्रावर १९६३ पर्यंत ब्रिटनमध्ये बंदी होती.
३) हे प्राचीन संस्कृत भाषेत लिहिण्यात आलं होतं, संस्कृतमध्ये काम म्हणजे इच्छा आणि सूत्र म्हणजे नियम. पुस्तकातील संदर्भानुसार इच्छा म्हणजे, गाणं, वाचणं, कविता, नाचणं आणि सेक्स सुद्धा.
४) कामसुत्रात एकूण ६४ सेक्सचे प्रकार दिले आहेत, काही व्यायाम प्रकारासारखे आहेत, वात्सायान यांनी लिहल्यानुसार आपण आठ प्रकारे प्रेम करू शकतो.
५) कामसूत्रानुसार महिलांचं मन जिंकण्यासाठी, नेहमी अथक राहण्यासाठी, पुरूषांनी त्यांच्या उजव्या हाताला, मोराचं, तरसाचं हाडं किंवा सोनं बांधलं पाहिजे.
६) कामसूत्रानुसार हलकासा चावा घेणे, ओरखडणे यामुळे अधिक प्रेम व्यक्त होत असतं, मात्र हे लिहित असतांना असंही सांगितलंय, तुमची नखं ही स्वच्छ, मृदू आणि चमकदार असावीत, थोडक्यात जंगली पणा नसावा.
७) आपलं घर कसं असावं याविषयी देखील कामसूत्रात लिहिण्यात आलं आहे. एक थुंकीपात्र, सतार टांगण्याठी हत्तीचा दात, मऊ बिछाना आणि फुलं असावीत.
८) यात एक धडा पूर्णपणे कोणत्या पुरूषाच्या पत्नीसोबत संभोग करावा यासाठी आहे.
९) कामसूत्रात वियाग्राचे अनेक उपाय सुचवले आहेत, चिमण्यांची उकळलेली अंडी, दुधात मिसळून त्यात बटर किंवा मध टाकून प्यायल्याने कामजीवन सुखी होतं.
१०) कामसूत्र ही महिलांच्या कलेविषयी अभ्यास करण्याची एक कला असल्याचं सांगितलंय.