मुंबई: आजकाल धकाधकीच्या आणि बिझी लाइफस्टाइलमुळे अशा किती महिला असतील ज्यांना लांब केस ठेवणं शक्य आहे. घनदाट आणि लांब केसांची काळजी घेण्यासाठी योग्य आहार आणि केसांची योग्य काळजी घेणं गरजेचं असतं, मात्र ते प्रत्येकाला शक्य नाही.
जर आपण काही उपाय दररोज केले तर लांब आणि घनदाट केस मिळवू शकता. केस वाढविण्यासाठी त्यांना तेल लावणं गरजेचं आहे.
आणखी वाचा - केस अधिक गळत असतील तर करा कढी पत्त्याचे हे उपाय!
तेल लावावं - केसांमध्ये दजवळपास १ तास तेल मुरलं पाहिजे, त्यामुळे केसांच्या मूळापर्यंत तेल जातं. डोक्यावर कोमट तेलानं मालिश करावी आणि गरम पाण्यातून काढलेल्या टॉवेलनं डोकं झाकून घ्यावं. त्यानं केसांना वाफ मिळते. कोणत्याही तेलानं केस वाढतात असं नाही, बदाम तेल केसांसाठी उपयुक्त आहे. त्यात व्हिटॅमिन इ मोठ्या प्रमाणात असतं.
केसांची स्वच्छता, दररोज केस धुणे - ज्याप्रकारे केसांना तेल लावणं गरजेचं आहे तसंच केसांची स्वच्छता राखणंही आवश्यक आहे. जर आपले केस लांब आहेत तर ते आठवड्यातून दोन वेळा धुवावेत. आपल्या केसांची स्वच्छता खूप गरजेची आहे, त्यामुळे केसांच्या मूळांना श्वास घेण्यास जागा मिळते.
हेल्दी डाएट - चांगल्या केसांसाठी योग्य आणि हेल्दी आहार आवश्यक आहे. पालेभाज्या, बदाम, मासे, नारळ इत्यादी आपल्या आहारात असतील तर केस चांगले राहतील.
केस बांधून ठेवावेत - प्रदूषण, धूळ, माती आणि हवेपासून केसांना वाचविण्यासाठी ते बांधून ठेवावेत. जर आपण प्रवासात जात असाल तर आपण केस बांधणं जास्त योग्य असेल.
केसांना ट्रिम करावे - केसांना तीन महिन्यातून एकदा ट्रिम करावे. त्यामुळे दोन फाटे फुटलेल्या केसांपासून (Devious double hair)सुटका होईल. केस ट्रिम केल्यानं ते चांगले वाढतात.
ड्रायर आणि इतर मशीनचा वापर करू नये - हॉट आयरन, ब्लो ड्रायर किंवा केसांना कुरळे करणारं मशीन वारंवार वापरू नये. त्यामुळे केस खराब होतात. जर आपले केस लांब आहेत तर ते वाळविण्यासाठी ड्रायरचा वापर करणं नुकसान करू शकतात, कारण त्यानं केस खराब होतात. केस वाळविण्यासाठी उन्हात पाच मिनीटं उभं राहावं पण ड्रायरचा वापर करू नये.
आणखी वाचा - केसगळतीवर हीना-मोहरी तेलाचं मिश्रण रामबाण उपाय
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.