www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
चेहऱ्यावर जखम घेऊन आता टीम इंडियाचा बॅट्समन रोहित शर्मा दिसणार आहे. सर्कशीत हत्तींवर होणाऱ्या अत्याचाराचा तो विरोध करणार आहे. एका जाहिरातीत रोहित प्राण्यांवरील अत्याचाराचा निषेध करतांना दिसेल.
प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेनं (पेटा) तयार केलेल्या जाहिरातीत रोहित शर्मा अंकुश दिल्यानं होणारी जखम चेहऱ्यावर घेऊन जाहिरातीत हत्तींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवलाय. या जाहिरातीला `ट्राय टू रिलेट टू एलिफेंट्स फेट-बॅन अॅनिमल सर्कसेज` असं नाव देण्यात आलंय. याद्वारे सर्कशीत काम करणारे हत्ती आणि इतर प्राण्यांना बंदी बनवून त्यांना दु:ख दिलं जातं हे योग्य नाही, असा संदेश देण्यात आलाय.
रोहित यात म्हणतो, `जनावरांना सन्मान मिळायला हवा, त्यांना बंदी करून ठेवू नये आणि आपल्या फायद्यासाठी त्यांच्याकडून मनोरंजन करवून घेऊ नये. आम्ही क्रिकेट खेळाडू आपल्या खेळावर खूप प्रेम करतो. मात्र सर्कसमध्ये प्राण्यांना घाबरवून, त्यांचा छळकरून काम करवून घेतलं जातं ते योग्य नाही.`
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.