पराभूत टीम इंडिया आज लाज राखणार का?

सलग दोन पराभव पत्करल्यानंतर आता कोहली अॅण्ड कंपनीचा मुकाबला असणार आहे तो अफगाणिस्तानशी. केवळ प्रतिष्ठा राखण्यासाठी नव्हे तर स्पर्धेतील आव्हान ठिकवण्यासाठी टीम इंडियाला अफगाणिस्तानवर मोठ्या फरकाने विजय मिळवण गरजेच आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 5, 2014, 12:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, फतेल्लाह
सलग दोन पराभव पत्करल्यानंतर आता कोहली अॅण्ड कंपनीचा मुकाबला असणार आहे तो अफगाणिस्तानशी. केवळ प्रतिष्ठा राखण्यासाठी नव्हे तर स्पर्धेतील आव्हान ठिकवण्यासाठी टीम इंडियाला अफगाणिस्तानवर मोठ्या फरकाने विजय मिळवण गरजेच आहे.

श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यानंतर कोहली अॅण्ड कंपनीचा मुकाबला होणार आहे तो अफगाणिस्तानशी..अफगाणिस्तानविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवून आपली उरली-सुरली प्रतिष्ठा जपण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असेल. तर बांग्लादेशला पराभूत करुन आयसीसी रँकिंगमध्ये दिमाखात सामिल झालेल्या अफगाणिस्तानचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला असेल.
पाकविरुद्ध फ्लॉप ठरलेल्या मिडल ऑर्डरला कमबॅक करावच लागेल. याचबरोबर खराब शॉट खेळून आपली विकेट गमावणा-या धवन आणि रोहितला ओपनिंगला जबाबदारीने खेळ करावा लागेल. बॉलर्सनादेखील आपल्या खराब कामगिरीची मालिका खंडीत करावी लागेल. कॅप्टन कोहलीला किती आणि कोणते बॉलर्स आजमावेत याच पुन्हा एकदा गणित मांडूनच पुढची चाल खेळावी लागेल. अन्यथा अफगाणिस्तानसारख्या तुलनेने कमकुवत टीमकडून भारताला धोका पोहचू शकतो.
ढिसाळ फिल्डिंग ही तर टीम इंडियाची कायमचीच डोकेदुखी आहे. त्यामध्ये कधी सुधारणा होणार देव जाणे...अझघर स्तानिकझाई आणि समुल्लाह शेनवारी या अफगाण बॅट्समनला रोखण्याचं आव्हान भारताच्या बॉलर्ससमोर असेल. तर मिरवाईस अश्रफकडून भारतीय बॅट्समनला सावध रहावं लागेल.
आता निदान अफगाणिस्तानविरुद्ध तरी लौकिकाला साजेशी कामगिरी करुन टीम इंडियाने लाज राखावी अशी आशा भारतीय क्रिकेटफॅन्स बाळगून आहेत. अन्यथा पाकिस्तानविरुद्धच्या जिव्हारी लागलेल्या पराभवाने आधीच घायाळ झालेले भारतीय क्रिकेट फॅन्स कोहली एँड कंपनीला कदापि माफ करणार नाहीत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.