मन शुध्दी करण्यासाठी स्नानानंतर हे सारं करा...

दिवसाचा आरंभ चांगला झाल्यास पूर्ण दिवसच चांगला जातो; म्हणूनच सकाळच्या वेळी शरीर शुद्धीसाठी आपण प्रतिदिन स्नान करतो.

Updated: Nov 7, 2012, 08:38 AM IST

www.24taas.com, मुंबई
दिवसाचा आरंभ चांगला झाल्यास पूर्ण दिवसच चांगला जातो; म्हणूनच सकाळच्या वेळी शरीर शुद्धीसाठी आपण प्रतिदिन स्नान करतो. शरिराप्रमाणे मन शुद्ध व्हावे, यासाठी प्रतिदिन पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे.
टिळा किंवा कुंकू लावावे
स्नानानंतर मुलांनी केसांना खोबरेल तेल लावावे आणि केस विंचरून डाव्या अंगाला (बाजूला) भांग पाडावा.
मुलांनी भ्रूमध्यावर (दोन भुवयांच्या मध्ये) मधल्या बोटाने टिळा (उभे कुंकू) लावावा, तर मुलींनी भ्रूमध्यावर अनामिकेने (अंगठ्या शेजारचे बोट) गोल कुंकू लावावे. मुलींनी शक्यतो टिकली लावू नये. मुला-मुलींनो, कुंकू लावलेल्या व्यक्तीला देवतेची शक्ती आणि चैतन्य मिळते, तसेच आसुरी शक्तींपासून रक्षण होते.

देवाची पूजा करावी
देवघरात पूजा झालेली असल्यास स्नानानंतर प्रथम देवघरासमोर उभे राहून देवाला हळद-कुंकू आणि फूल वहावे. देवाला उदबत्तीने ओवाळावे. एखाद्या वेळी पूजा झालेली नसल्यास वडीलधार्यां ची अनुमती घेऊन आपण ती करावी.

श्री गणेशवंदन करावे आणि अन्य श्लोक म्हणावेत
देवाची पूजा करून झाल्यावर श्री गणेशाला वंदन करावे. या वेळी दोन्ही हात जोडून पुढील श्लोक म्हणावा.
वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
अर्थ : (दुर्जनांचा नाश करणारी) वाकडी सोंड, महाकाय (शक्तीमान) आणि कोटी सूर्यांचे तेज असलेल्या श्री गणेशा, माझी सर्व कामे सदा कोणतेही विघ्न न येता सफल होऊ देत.