... आणि विसरा भूतकाळातल्या कटू आठवणी

भूतकाळाचा अभ्यास करा आणि त्रासदायक गोष्टी विसरा, असं म्हणणं आहे लंडनच्या काही अभ्यासकांचं. स्कॉटलंडच्या ‘युनिव्हसिटी ऑफ सेन्ट अन्ड्रूज’च्या अभ्यासकांच्या एका टीमनं हा निष्कर्ष काढलाय.

Updated: Jun 23, 2012, 12:42 PM IST

 www.24taas.com, लंडन 

 

भूतकाळाचा अभ्यास करा आणि त्रासदायक गोष्टी विसरा, असं म्हणणं आहे लंडनच्या काही अभ्यासकांचं. स्कॉटलंडच्या ‘युनिव्हसिटी ऑफ सेन्ट अॅन्ड्रूज’च्या अभ्यासकांच्या एका टीमनं हा निष्कर्ष काढलाय.

 

आपल्या भूतकाळात घडलेल्या काही काळ्या आठवणी आपल्या सर्वांच्याच नेहमीच लक्षात राहतात... आपण कितीही आठवू नये, असं ठरवलं तरी... काही जण तर मानसिक रोगांचे बळी ठरतात. त्यामागची कारणंही तितक्याच तीव्रतेनं आपल्या आठवणींमध्ये ठाण मांडतात. पण, अशा आठवणी आणि त्यामुळे आपल्याला जाणवणारा त्रास नष्ट करायचा असेल तर त्या आठवणींचा त्रास करून घेण्याऐवजी अभ्यास करा आणि त्यातून स्वत:च सकारात्मक निष्कर्ष काढा.

 

डेली मेल या वर्तमानपत्राच्या म्हणण्याप्रमाणे या अभ्यासाच्या प्रमुख डॉक्टर सायमा नुरीन यांनी, भावनात्मक घटनाक्रम लक्षात घेऊन त्यांचा अभ्यास केल्यानं व्यक्तींना आपल्याच व्यक्तीमत्त्वाविषयी काही गोष्टी नव्यानं कळतात, असं म्हटलंय. त्या म्हणतात, ‘आम्ही केलेल्या अभ्यासाता आम्हाला स्पष्ट दिसून आलं की आपल्या जुन्या आठवणी विसरण्यासाठीच लोकांनी त्याचा अभ्यास करावा’. तुमच्याही मनात कुठेतरी दडून बसलेल्या कटू आठवणी असतीलच की... मग, हा प्रयोग ट्राय करा आणि हो... फरकाचाही अभ्यास करायचं विसरू नका...

 

.