मधुमेहाच्या तपासणीसाठी 'कॉन्टॅक्ट लेन्स'

मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक खुशखबर आहे. आता शरीरातील शर्करेचं प्रमाण जाणणं सोपं होणार आहे. आणी हे काम करणार आहे एक कॉन्टॅक्ट लेन्स... विश्वास बसत नसेल ना! पण, हे खरं आहे.

Updated: May 29, 2012, 10:55 AM IST

 www.24taas.com, लंडन

 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक खुशखबर आहे. आता शरीरातील शर्करेचं प्रमाण जाणणं सोपं होणार आहे. आणी हे काम करणार आहे एक कॉन्टॅक्ट लेन्स... विश्वास बसत नसेल ना! पण, हे खरं आहे.

 

नुकतीच वैज्ञानिकांनी एका कॉन्टॅक्ट लेन्सची निर्मिती केलीय जी आपल्या शुगर लेव्हलची माहिती आपल्यापर्यंत पोहचवेल. आणि तेही आपल्या अश्रुंच्या साहाय्यानं... त्यामुळेच लोकांना आता ‘शुगर लेव्हल’ तपासण्यासाठी प्रत्येक वेळेस रक्त देण्याची गरज पडणार नाही.

 

ओहियोमधल्या एकरान युनिव्हर्सिटीच्या एका टीममधल्या शोधकांचा दावा आहे की, एखाद्या व्यक्तीच्या शरिरातील शर्करेचं प्रमाण कमी-जास्त प्रमाणात होत असेल तर लगेचच या कॉन्टॅक्ट लेन्सचा रंग बदलेल. त्यामुळे शरिरातील शर्करेच्या तपासणीसाठी ही कॉन्टॅक्ट लेन्स उपयोगी पडेल. टीमचे प्रमुख डॉ. जून हू सांगतात की, ही लेन्स केमिस्ट्री लॅबमधल्या पीएच पेपरसारखं काम करते. शर्करेच्या प्रमाणानुसार या लेन्सचा रंग बदलत जातो, तेही रक्ताशिवाय. त्यामुळेच या कॉन्टॅक्ट लेन्स मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान ठरू शकतात.