लंडन- तुम्ही अगदी पोटभर जेवूनसुद्धा तुमचं वजन तुम्ही ताब्यात ठेवू शकता, हा शोध लावलाय ‘हॉवर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’ने.
हा शोध लावण्यासाठी त्यांनी १२००० लोकांच्या आहाराचा २० वर्षांहून जास्त काळ अभ्यास केला. आणि ते या निष्कर्षावर पोहोचलेत की भरपूर प्रमाणात सकस आहार घेतल्यानेही वजन नियंत्रणात राहते. त्यासाठी कमीत कमी आहार करायला लावणाऱ्या डाएटची गरज नाही.
वजन कमी करणं म्हणजे अगदीच पाप्याचं पितर बनणं असा होत नाही. असं मत ब्रिटीश न्युट्रिशन फाऊंडेशनच्या आहारतज्ज्ञ अँनी ओ’कोनरनी व्यक्त केलंय.
ओ’कोनोरच्या मते, आहारातून किती ग्रॅम कॅलरीज आणि किती जास्त एनर्जी तुम्हाला मिळते ते महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ तुम्ही स्पॅगटी बॉलोंगोजमध्ये मांसाचं प्रमाण कमी केलंत आणि बऱ्याच भाज्या आणि अर्ध फॅट असलेलं चिज घातलं, तर त्यातील ऊर्जातत्व तितकंच राहतं, म्हणजे एवढ्याच कॅलरीजसाठी तुम्ही तो पदार्थ दोनदा खाऊ शकाल.