www.24taas.com, लंडन
लंडन ऑलिम्पिकमध्ये आज भारताला पहिल्याच दिवशी तिरंदाज स्पर्धक आपले जलवे दाखवू शकतील. त्यामुळे आजचा शुक्रवार भारतासाठी मेडलचा असेल. भारताच्या तिरंजाद टीमकडून पदकाची आशा आहे.
भारतीय तिरंदाज टीमचा चांगला फॉर्म आणि रॅंकिंगमधील सुधारणा पाहता सुवर्ण पदाकाची आशा आहे. तसेच तिरंदाज टीम चांगल्या पदकांची लूट करेल, अशी शक्यता आहे. आज लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटननंतर तिरंदाज स्पर्धेने सुरूवात होईल. ही स्पर्धा रॅंकिंग राऊंडने होईल.
महिला फुटबॉलची स्पर्धा बुधवारपासून सुरू झाली आहे.२००४ अथेन्स गेम्सनंतर दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. मात्र, भारतीय तिरंदाज टीमने ऑलिम्पिकसाठी जादा सहा गुणांची कमाई केली आहे. भारतीची टीम कमीत कमी चारमधील दोन इव्हेंटमध्ये मेडल जिंकण्याची शक्यता आहे.
जगातिक क्रमवारीत नंबर एकवर असलेली भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी भारताची मान उंचावेल. मात्र, तिच्यावर चाहत्यांचा दबाव असणार आहे. त्यामुळे ती कशी कामगिरी करते याकडे लक्ष आहे. दीपिकाने २००९मे वर्ल्ड चॅम्पियनमे पहिला आंतरराष्ट्रीय पदक जिंकले होते. या पदाकानंतर ती प्रसिद्धीमध्ये आली.