'सुहाना सफर'? महिलांना मात्र गरगर

एका नव्या शोधानुसार असे समजते की दररोज प्रवास करणाऱ्या महिला ह्या सतत चिडखोर बनतात.लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्सच्या संशोधकांनी असे जाणले आहे की रोज रोज प्रवास करणाऱ्या महिलांच्या मानसिक स्वास्थावर वाईट परिणाम घडून येतो.

Updated: Nov 15, 2011, 12:16 PM IST

झी २४ तास वेब टीम, लंडन

 

एका नव्या शोधानुसार असे समजते की दररोज प्रवास करणाऱ्या महिला ह्या सतत चिडखोर बनतात.लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्सच्या संशोधकांनी असे जाणले आहे की रोज रोज प्रवास करणाऱ्या महिलांच्या मानसिक स्वास्थावर वाईट परिणाम घडून येतो. परंतु पुरूषांना मात्र यामुळे काही त्रास होत नाही. संशोधनात असे समजते की स्त्रियांनी कमीत कमी प्रवास केला तरी त्या एकप्रकारचा तणावाखाली दिसून येतात.

 

अनेक वेळेस आपल्या घरून ते ऑफिस असा प्रवास करून महिला या तणावात येतात. जेव्हा की आपल्या पुरूष मित्रांकडे पाहिल्यास ते या प्रवासाने मात्र तणावाखाली आलेले दिसत नाही. आणि हे सिद्ध देखील झाले आहे. संशोधनात असे आढळले आहे की, प्रवासामध्ये महिला या पुरूषांपेक्षा खूप लवकर थकतात आणि चिडचिडपणा करतात. तसेच ज्या गर्भवती स्त्रिया असतात, त्यांना तर फार मोठ्या प्रमाणात प्रवासाचा त्रास होतो आहे. असे संशोधन टीमचे प्रमुख प्रोफेसर जेनिफर रॉबटर्सने सांगितलं.