गर्भावस्थेतच बनवा बाळाला सशक्त!

आई अन् बाळाचं सहज सुंदर नातं... हवंहवंसं... आपलं बाळ शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावं, मानसिकदृष्ट्या कणखर बनावं, असं कोणत्या आईला वाटणार नाही. पण, जर तुम्ही स्वत: माता असाल आणि तुम्हालाही असंच वाटत असेल तर सर्वात अगोदर गर्भावस्थेत स्वत:ला तणावापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा... ही पहिली सुरुवात असेल ज्यामुळे तुमचं मूल सशक्त आणि कणखर बनू शकेल.

Updated: Jul 31, 2012, 05:24 PM IST

www.24taas.com, लंडन

आई अन् बाळाचं सहज सुंदर नातं... हवंहवंसं... आपलं बाळ शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावं, मानसिकदृष्ट्या कणखर बनावं, असं कोणत्या आईला वाटणार नाही. पण, जर तुम्ही स्वत: माता असाल आणि तुम्हालाही असंच वाटत असेल तर सर्वात अगोदर गर्भावस्थेत स्वत:ला तणावापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा... ही पहिली सुरुवात असेल ज्यामुळे तुमचं मूल सशक्त आणि कणखर बनू शकेल.

गर्भावस्थेत धावपळ आणि ताणतणाव बाजूलाच ठेवा, असा सल्ला चिकित्सकांनी दिलाय. कारण मातेच्या ताणतणावाचा परिणाम सरळसरळ बाळाच्या स्वास्थ्यावर होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. एव्हढंच नव्हे, तर हा परिणाम बाळांवर दीर्घकाळासाठीही जाणवू शकतो, अशीही पृष्ठी तज्ज्ञांनी आता जोडलीय.

किंग्स कॉलेज लंडनमधल्या मनोविश्लेषक विभागातल्या संशोधनकर्त्यांनी नुकताच या विषयावर सखोल अभ्यास केला. यानंतर दिलेल्या अहवालात त्यांनी म्हटलंय, परिवारातल्या सदस्यांचं निधन किंवा अशाच काही धक्कादायक गोष्टी घडल्या तर गर्भवती मातेला मानसिक आधार मिळणं अत्यंत गरजेचं आहे. गर्भावस्थेत आई जर अशा काही ताणतणावाला बळी पडली तर त्याचा परिणाम मुलांवर ४ वर्षांनंतरही दिसून येतो काही वेळा तर ४ वर्षानंतर बाळाला स्वास्थ्यविषयक तक्रारींना सुरुवात होते. लंडनहून प्रकाशित होणाऱ्या डेली मेलमध्ये हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आलाय.

गर्भावस्थेत आई ताणतणावाखाली वावरत असेल तर याचा परिणाम बाळाच्या जनुकांवर अशा प्रकारे होतो की जन्मानंतर ही मुलं रोगांना सहज बळी पडतात, असं या संशोधनकर्त्यांनी स्पष्ट केलंय.

.