www.24taas.com, लंडन
एका महत्त्वपूर्ण शोधातून शास्त्रज्ञांनी चुंबकीय साबण तयार केला आहे.या साबणात पाण्यात विरघळलेले लोहतत्व असणारे क्षार आहेत.
ब्रिस्टॉल विश्वविद्यालयाच्या एका ग्रुपने असं स्पष्ट केलंय की पाण्यात टाकल्यावर चुंबकीय साबण आपला प्रभाव दाखवायला सुरूवात करतो. यात आर्द्रतेचा वापर करत निर्माण होणाऱ्या समस्या संपतील. औद्योगिक सफाईत हा साबण क्रांतीकारी बदल घडवेल.
आर्द्रक द्रव पदार्थात मिसळल्यावर पृष्ठभागावरीलताण कमी करतो. शास्त्रज्ञांच्या ग्रुपने क्लोराईड आणि ब्रोमाईडपासून बनलेल्या निष्क्रिय आर्द्रकामध्ये लोहतत्व मिसळून हा चुंबकीय साबण तयार केला आहे.
जगातला पहिला चुंबकीय साबण
